या तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात !
जयपूरच्या दोन मुलींनी महिलांना त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूकतेसाठी अभियान सुरू केले आहे आणि मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन्स कसे वापरावे ते शिकवत आहेत. हे अभियान सुरू करणा-या आहेत, इनब खुर्रम ज्यांनी त्यांचे शिक्षण रसायन शास्त्रात पदव्योत्तर पदवी पर्यंत पूर्ण केले आहे आणि डॉ हेतल सचनंदानी ज्या दंतवैद्यक मध्ये शिक्षण घेत आहेत.
हेतल आणि इनब झोपडपट्टीतून जातात आणि सॅनिटरी नॅपकिन्सचे तसेच इतर स्वच्छता बाबतच्या वस्तूंचे मोफत वाटप करतात. इनब म्हणतात की, त्यांना यातून महिलांमध्ये आरोग्याबाबतच्या प्रश्नावर जागरूकता निर्माण करायची आहे, ज्या अस्वच्छ कपडे सॅनिटरी नॅपकिन्सच्या ऐवजी वापरतात आणि त्यांना आरोग्याच्या समस्या येतात. त्या या महिलांना स्वच्छतेची मुलभूत संकल्पना समजवतात आणि हे नॅपकिन्स कसे वापरावे ते सांगतात.

सध्याच्या स्थितीत भारतात, ज्यावेळी महिलांच्या स्वच्छता आणि आरोग्याचा मुद्दा येतो त्यावेळी स्थिती फारच वाईट असल्याचे दिसते. २०१५-१६च्या राष्ट्रीय कुटूंब आरोग्य अहवालानुसार ग्रामिण भागात केवळ ४८ टक्के महिलाच मासिकधर्माच्या काळात सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. असे असले तरी शहरी भागात देखील स्थिती काही फारशी चांगली म्हणता येणार नाही, जेथे ७८ टक्के महिलांना मासिक धर्माच्या काळात आरोग्याच्या सुविधा मिळतात. या माहितीतून समोर येते की मोठ्या प्रमाणात महिला या काळात अनारोग्याच्या बळी ठरतात, आणि त्यांना आरोग्यदायी कपडे मिळत नाहीत.
हेतल म्हणतात, त्यांच्या अभ्यासातून त्यांना लक्षात आले की, ८० टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरत नाहीत, त्यापैकी ब-याच जणींना अद्याप ते काय आहे ते सुध्दा माहिती नाही. अगदी ज्या महिलांना त्याची माहिती आहे त्यापैकी अनेक जणींना ते परवडत नाही. त्या पुढे म्हणाल्या की, त्यांना याबाबतचे जागरूकता अभियान चंडिगढ मध्ये सुरू असल्याचे समजले आणि तसेच आपण जयपूरमध्ये घ्यावे असा त्यांनी विचार केला.

हेतल यांना अद्याप यासाठी सरकारकडून किंवा सेवाभावी संस्था कडून कोणताही पाठिंबा नसला तरी त्यांना व्टिटरवरून मदत मिळते. त्यासाठी अनेक जण देणग्या देतात आणि पेटिएमच्या माध्यमातून पैसे पाठवितात. त्रिशाल पिंचा, ज्या हेतल आणि इनब यांची मैत्रिण आहेत या अभियानात त्यांना मोलाची मदत करतात, हेतल यांचे आणखी काही मित्र मैत्रिणी हे अभियान दिल्लीत सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी २०१२मध्ये एक योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये ग्रामिण भागात सॅनिटरी नॅपकिन्सचा प्रचार व्हावा यासाठी १५० कोटी रूपये मंजूर करण्यात आले. या योजनेत सॅनिटरी नॅपकिन्स दारिद्र्यरेषेखालच्या महिलांना एक रूपयात दिले जात, आणि त्यावरच्या महिलांना पाच रूपयात दिले जात असत.
अशाप्रकारे या देशात स्थिती नाजूक असते ज्यावेळी स्त्रीयांच्या आरोग्याचा मुद्दा येतो, हेतल यांच्या सारख्या व्यक्ती आणि त्यांचे सहकारी त्यांच्या प्रामाणिक कामातून प्रोत्साहित करत राहतात आणि त्यातूनच देशात जागरूकता निर्माण होत राहील.