भारतीय रेल्वेने प्रवाश्यांना मधल्या आणि खालच्या बर्थवर रात्री१० ते सकाळी ६पर्यंत झोपण्यास सांगितले!
भारतीय रेल्वेने आता प्रवाशांच्या मधल्या आणि खालच्या बर्थवर जास्त वेळ झोपण्यामुळे होणा-या भांडणाना आळा घालण्याचे ठरविले आहे. नव्याने जारी करण्यात आलेल्या रेल्वेच्या निवेदनानुसार झोपण्याची वेळ केवळ रात्री१० ते सकाळी६ देण्यात आली आहे.

राखीव आसने असलेल्या बोगीतील प्रवाश्यांना या वेळे शिवाय झोपण्याचे बर्थ मोकळे ठेवावे लागतील, हे निवेदन जारी करण्यापूर्वीच्या काळात रात्री९ ते सकाळी६ दरम्यान झोपण्याची वेळ देण्यात आली होती. मात्र त्यात काही आजारी, गर्भवती महिला, कमकुवत प्रवासी असतील तर त्यांना सूट देण्यात आली होती. त्यावेळी परवानगी नसलेल्या वेळेत सुध्दा प्रवाश्यांना झोपता येत होते. या बाबतच्या वृत्तानुसार या निवेदनात म्हटले आहे की, रात्री दहा ते सकाळी सहा यावेळे शिवाय या बर्थ वर प्रवाश्यांना बसण्याची जागा देण्यात आली आहे, यावेळेत आरएसी तिकीटे असलेल्या प्रवाश्यांना बसता येईल, या प्रमाणेच वरच्या बर्थवरच्या प्रवाश्यांना देखील हा नियम लागू राहील, प्रवाश्यांनी यासाठी आजारी, कमजोर गर्भवती महिला, यांना सहकार्य करावे आणि त्यांना अतिरिक्त वेळेत देखील झोपू द्यावे.
भारतीय रेल्वेचे जनसंपर्क महासंचालक अनिल कुमार सक्सेना म्हणाले की, “ हे यासाठी करण्यात आले आहे की, ज्या प्रवाश्यांची तिकीटे आरएसी असतात त्यांना थोड्यावेळासाठी बसण्याची जागा उपलब्ध करून देता यावी. लोकांनी दिवसा झोपू नये जेणे करून बर्थवरील जागा व्यापली जाईल, जी अन्य़था बसण्याच्या प्रयोजनासाठी आहे”.