बंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे!
३१ वर्षीय राजलक्ष्मी, वेगवेगळ्या जबाबदा-या अगदी सहजतेने सांभाळतात, दंत विशेषज्ञ, दंतविषयक सल्लागार, आणि सहायक प्राध्यापिका. आणि आता बंगलूरूच्या या दंतचिकित्सिका देशाचे प्रतिनिधत्व करण्यासाठी मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७ मध्ये पोलंड मध्ये सहभागी होत आहेत.

राजलक्ष्मी यांच्यासारख्या महत्वाकांक्षी तरूण कन्येला तिच्यातील उर्मीने वेगळ्या वाटेने नेले, २००७मध्ये बीडिएस च्या निकालानंतर त्यांना चेन्नई येथे राष्ट्रीय परिषदेत जायचे होते, मात्र चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला त्यात त्यांच्या डाव्या पायाच्या स्नायूना दुखापत झाली, आणि त्या अधू झाल्या. एका मुलाखती मध्ये त्यानी सांगितले की, “ या अपघातानंतर माझा पुनर्जन्मच झाला आहे, माझ्यातील नवे व्यक्तिमत्व जन्मले आहे”.
दोष देत बसण्यापेक्षा त्यांनी स्वत:च्या जीवनाची लढाई लढायचे ठरविले, आणि सारे लक्ष मानसोपचाराकडे दिले आणि त्यानंतर त्यानी फॅशन आणि एमडीएस या आपल्या आवडत्या विषयात प्राविण्य मिळवले. २०१४ मध्ये असेच त्यांना इंटरनेट वरून मिस व्हिलचेअर इंडिया पिजंट बद्दल समजले, राजलक्ष्मी यानी ही स्पर्धा जिंकण्याचे ठरविले, आणि त्यांच्यासाठी स्वप्न साकार झाले अशी स्थिती आली.
त्या त्यांच्या संस्थेच्या अध्यक्षा आहेत, एसजे फाऊंडेशन, जी अपंगाच्या विकलांगाच्या साठी कार्यरत आहे असे याबाबतच्या माहिती मध्ये नमूद करण्यात आले आहे. ज्या द्वारे त्या विकलांगाशी मैत्रीपूर्ण व्यवहार करतात त्या म्हणतात की, “ माझे व्यंग दिसण्यासारखे आहे, पण असे अनेकजण आहेत ज्यांचे व्यंग दिसत नाही. व्यंग अनेक प्रकारचे असू शकते. ते वागण्यात असू शकते, मनात किंवा व्यवहारात देखील असू शकते. पण आपण एखाद्या व्यक्तीला त्यावरून ओळखू शकत नाही”.